शेतकऱ्यांसाठी ₹३१,६२८ कोटींची मदत जाहीर.. प्रति हेक्टरी किती नुकसान भरपाई मिळणार?Nuksan Bharpai

Nuksan Bharpai : राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे विक्रमी मदत पॅकेज जाहीर केले आहे. राज्यातील २९ जिल्हे आणि २५३ तालुके या मदतीच्या पॅकेजमध्ये सरसकट समाविष्ट करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पुन्हा उभे राहावे या उद्देशाने हे पॅकेज तयार करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या महत्त्वाच्या घोषणा केल्या असून, पिकांच्या नुकसानीसाठीच्या अटी शिथिल करून ही मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी Nuksan Bharpai मोठी मदत जाहीर

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी एकूण ६,१७५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. बियाणे आणि शेतीच्या इतर कामांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये अतिरिक्त दिले जातील. वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीसाठी जाहीर केलेली मदत खालीलप्रमाणे आहे:

शेतकरी वर्गमदतीची रक्कम (प्रति हेक्टरी)
कोरडवाहू शेतकरी₹ १८,५००
हंगामी बागायतदार शेतकरी₹ २७,०००
बागायती शेतकरी₹ ३२,५००

ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे, त्यांना विम्यातून मिळणाऱ्या मदतीव्यतिरिक्त राज्य सरकारकडून ₹ १७ हजार प्रति हेक्टर मदत केली जाणार आहे.

इतर नुकसानीसाठी विशेष आर्थिक मदत

शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि घरांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खालीलप्रमाणे विशेष घोषणा केल्या:

  • खरडून गेलेल्या जमिनीसाठी: खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी ₹ ४७ हजार रोख मदत दिली जाईल आणि त्या जमिनी सुधारण्यासाठी नरेगाच्या माध्यमातून ३ लाख रुपये प्रति हेक्टरी दिले जातील.
  • विहिरीतील गाळ काढणे: ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे किंवा नुकसान झाले आहे, अशा प्रत्येक विहिरीसाठी विशेष बाब म्हणून ₹ ३० हजार भरपाई दिली जाणार आहे.
  • दुधाळ जनावरांचे नुकसान: दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ₹ ३७,५०० ची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात तीन जनावरांची अट रद्द करण्यात आली असून, जेवढी जनावरे दगावली तेवढ्या जनावरांना मदत दिली जाईल.
  • दुकानदारांना मदत: ज्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे, त्यांना ₹ ५० हजार पर्यंतची मदत केली जाईल.
  • घरांची पडझड: ज्यांची घरे पडली आहेत, त्यांना नवीन घरे उभारण्यासाठी मदत केली जाईल.
  • पायाभूत सुविधा: रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी १० हजार कोटींची मदत केली जाईल.

मदत कधी मिळणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या ३१,६२८ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज आहे. जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सीएसआर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत केली जाणार असून, गरज पडल्यास आणखी मदत करण्याची तयारी शासनाची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment